हरवलेला संवाद

आज आपल्या या Technosavvy जगात, माणसं, त्यांच्या मधील संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. माणसं जरी Technologyने जोडली गेली असली तरी पूर्वीसारखं तासन् तास गप्पा, त्यातून जुन्या आठवणींना दिलेला उजाळा हे कुठेतरी हरवत चाललय…मान्य आहे ना!!…आपण ज्या शतकात राहातो त्यां शतकातील प्रत्येक गोष्ट आपण आत्मसात केली पाहिजे…मग त्याला Technology तरी कसा अपवाद असेल कारण त्याशिवाय ह्या स्पर्धात्मक जीवनाच्या शर्यतीत आपला निभाव लागणं कठीण होऊन बसेल…पण तरी पूर्वीसारख्या होत असलेल्या भेटीगाठी कमी होत चालले आहे. शाळेतील दूर गेलेले मित्र मैत्रीणी Social media च्या trendमुळे का होईना पण जवळ आले असलेल्या तरी ते फक्त तेवढ्यापूरताच मर्यादित राहतात…सध्या कुठल्या कार्यक्रमाचे नियोजन असो किंवा आमंत्रण देणे असो ते सुध्दा आता फास्ट Trending झालय. पूर्वी सणांच्या निमित्तावे का होईना एकत्र येत होती… पण आज त्याची जागा Whats app, Facebook ने घेतली आहे…