माझी गझल

–अखंड शब्द–

अखंड शब्द,मनात तुझ्या रे,
आण ओठावर बोल ते सारे–।

वेदना अफाट व दु:खही फुलांना,
मिटण्याची वाट बघताय किनारे–।

ओढ जरासा,तोड जरासा,
वाहून जाऊदे दु:खद वारे–।

वेदनाही त्या हसती वेड्या
तुझ्याच जख्मांवरती ते सारे–।

ऐक जरासा,बघ जरासा,
अंतर्मनीचे ते तप्त निखारे–।

विसर आता ते प्रेमही शहाण्या,
नको आठवू ते भाव पुन्हारे–।

–निलेश पाटील,पारोळा–
–मो-9503374833–